६४ MP कॅमेरा; लवकरच येतोय फोटोंचा बाहुबली
माय अहमदनगर वेब टीम
लाखो लोकांना काय हवं असतं? नोकरी, चांगला पार्टनर, आनंद आणि फिरण्याची, व्यक्त होण्याची अमर्याद संधी.. पण एवढंच पुरेसं नाही. सध्या प्रत्येक जण फिरतो तेव्हा त्याच्या आठवणी मित्रांसोबत शेअर करण्यासाठी उत्सुक असतो. या सर्व प्रवासात तुम्हाला खुलवण्यासाठी एका पार्टनरची गरज असते आणि तो पार्टनर आहे स्मार्टफोन. सॅमसंगने ग्राहकांची हीच गरज ओळखली आणि गेल्या वर्षी Galaxy M30s हा दमदार फोन आणला. हा स्मार्टफोन #GoMonster चा परफेक्ट भाग होता. पण २०२० मध्ये कंपनीने Samsung Galaxy M31 च्या MEGA लाँचिंगची तयारी केली आहे.

कंपनीने या फोनची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातूनही दिली आहे. शिवाय आता MegaMonster ट्रेलर लाँचिंगच्या निमित्ताने Samsung Galaxy M31 विषयी आणखी माहिती उपलब्ध झाली आहे. नयनरम्य ठिकाणी MEGA सेलिब्रिटींसोबतची दृष्य टीझरमधून दिसत आहेत. Samsung Galaxy M31 चा ६४ मेगापिक्सेल कॅमेरा हे या वर्षातलं सर्वात मोठं आकर्षण असणार आहे. सॅमसंगच्या ट्रेलर व्हिडीओने याची उत्सुकता आणखी वाढवली आहे. या व्हिडीओमध्ये नयनरम्य दृष्य नजर खिळवून ठेवतात. हा फोन ग्राहकांना कॅमेऱ्यासोबत बरंच काही देणार आहे हे ट्रेलरने दाखवून दिलंय.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post