शिवजयंती मिरवणुकीत नाचण्यावरून वाद ; तरुणाचा भाेसकून खून,माय अहमदनगर वेब टीम
औरंगाबाद - शिवजयंती मिरवणुकीत नाचण्यावरून वाद होऊन दोघांनी एकाला धारदार शस्त्राने भोसकल्याची घटना पुंडलिकनगर परिसरातील हनुमाननगरमध्ये बुधवारी रात्री ९ वाजता घडली. यात श्रीकांत गोपाळ शिंदे (२०, रा. गारखेडा परिसर) याचा मृत्यू झाला.

हनुमाननगर चौकातील मिरवणुकीत सर्वजण नाचत असताना श्रीकांत रक्ताच्या थारोळ्यात आढळला. दोन हल्लेखोर गर्दीतून पसार झाले. पोलिसांनुसार, जखमी अवस्थेत श्रीकांतने मारेकऱ्यांची नावे सांगितली होती.

दोघे संशयित गुन्हेगारी पार्श्वभूमीचे

सूत्रांनुसार, भोसले व वैद्य नामक तरुणांनी श्रीकांतला भोसकले. दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची चर्चा अाहे. वैद्यवर मंगळवारीच एका खुनाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post