जाणून घ्या, चंदनाचे विविध आरोग्यदायी फायदे



माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क -  देवाच्या पूजेमध्ये चंदनला खूप महत्त्व आहे. अनेक कार्यांत त्याचा वापर केला जातो. याशिवाय चंदनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदातही त्यास महत्त्व आहे. चंदनामुळे शरीराला थंडावा मिळतो. साबण, कॉस्मेटिक, परफ्यूम, अगरबत्तीसाठी त्याचा वापर होतो. चंदनाचे तेल व पावडर बाजारात मिळते. चंदनाचे कोणते फायदे आहेत ते जाणून घ्या...

हे आहेत फायदे
> कमी प्रमाणात भाजल्यास अथवा चटका लागल्यास चंदन तुपात मिसळून लावावे. दाह कमी होतो.
> चंदन पावडर पाण्यात मिसळून आंघोळ केल्यास शरीर ताजेतवाने होते.
> शरीराला खाज येत असल्यास अथवा त्वचेसंबंधित एखादी तक्रार असल्यास चंदन अत्यंत गुणकारी ठरते.
> तणाव दूर करण्यासाठी सुद्धा चंदनाचा उपयोग केला जातो.
> चेहरा काळवंडला असेल तर चंदनाचा लेप त्वचेवर लावावा.
> त्वचा मुलायम आणि तजेलदार होण्यासाठी चंदन अत्यंत गुणकारी आहे.
> चेहऱ्यावर मुरूम जास्त असल्यास गुलाब पाण्यात चंदन मिसळून लेप लावा.
> डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतील तर चंदनाचा लेप डोळ्यांच्या खाली लावा.
> शरीरातील स्नायू दुखत असल्यास चंदनाच्या तेलाने मालिश करावी.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post