इंदुरीकर महाराजांनी नोटिसला दिले उत्तर



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - गेल्या आठ दिवसापासून ह.भ.प इंदुरीकर महाराज यांच्या वकिलांनी व सेवकांनी आज बुधवारी  दुपारी चार वाजण्याच्या सुमारास नगर येथील जिल्हा रुग्णालयत येऊन त्यांच्या वक्तव्यावरील खुलासा सादर केला. तर  इंदुरीकर महाराज यांच्या संबंधित वकिलांनी दोन दिवसानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू असे त्यांनी सांगितले

गेल्या काही दिवसांपासून ह.भ.प इंदूरीकर महाराज यांनी केलेल्या वक्तव्याचे चांगलेच पडसाद राज्यभर उमटले आहे. त्यांच्या वक्तव्याबद्दल अनेक संघटनांनी आक्षेप घेतलेला आहे. दरम्यान इंदुरीकर महाराज यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. तर दुसरीकडे नगरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रवीण मुरंबीकर यांनी इंदुरीकर महाराज यांना नोटीस बजावून खुलासा करण्यास सांगितले होते.  या नोटिसाचा खुलासा करण्याचा आज शेवटचा दिवस होता. आज सुट्टी असल्यामुळे खुलासा येतो की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

इंदुरकर महाराजांचे वकील शिवडीकर हे एका सेवकासोबत आज दुपारच्या सुमारास जिल्हा रुग्णालयांमध्ये  दाखल झाले. या ठिकाणी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आले असता  त्यांनी त्या ठिकाणी सुरुवातीला पळ काढला. मात्र आज कोणत्याही परिस्थितीमध्ये खुलासा सादर करायचा असल्यामुळे त्यांनी तेथील अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क केला.  त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांकडे तुम्ही खुलासा सादर करा असे सांगितले. त्यानंतर अपघात कक्ष विभागांत कार्यरत असलेल्या डॉक्टरांकडे त्यांनी खुलासा सादर केला. विशेष म्हणजे त्यांच्या वकिलांनी हा खुलासा दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याची सही व शिक्का घेऊन दुसऱ्या दाराने निघून जाण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना प्रसिद्धीमाध्यमांनी विचारल्यावर त्यांनी बोलण्यास नकार दिला.
दोन दिवसापूर्वी महाराजांनी त्यांचा खुलासा केलेला होता आज आम्ही नोटीसला उत्तर दिलेले आहे. एवढीच प्रतिक्रिया महाराजांचे वकील शिवडीकर यांनी दिली. तसेच दोन दिवसात महाराज अपाली भुमिका स्पष्ट करतील असे ही त्यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post