गाजराच्या रसाचे हे आहेत फायदे
माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - गाजर सलाड म्हणून आपण खातो. मात्र ग्लासभर गाजराचा रस नियमित सकाळी पिण्याची सवय लावली. शरीर निरोगी राहते. गाजराच्या रसाचे अनेक फायदे आहेत जाणून घेऊया...
साखर नियंत्रणात राहते
ग्लासभर गाजराच्या रसामध्ये कॅलरीज, साखर नसते. मात्र आवश्यक पोषणद्रव्य आणि मिनरल्स असतात. यामुळे मधूमेहींना गाजराचा रस पिणे चांगले ठरते.
ब्रेस्ट कॅन्सरशी सामना करते
न्यूट्रिशन्स आणि कॅन्सरमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, गाजराचा रस तीन आठवडे नियमित प्यायल्यास प्लाझ्मा केरोटेनॉइड्स सुधारतात तसेच ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस सुधारण्यास मदत होते.
केस,डोळ्यांचे आरोग्य सुधारते
गाजराचा रस अॅंटिऑक्सिडंट आणि पोटॅशियमयुक्त असल्याने पेशींच्या निर्मितीला चालना मिळते. यामुळे त्वचेला आणी केसांना नैसर्गिक चकाकी येते. व्हिटॅमिन ए- गाजरामध्ये व्हिटॅमिन ए चा मुबलक साठा असतो. त्यामधील बीटा कॅरोटिन घटकाचे व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतर होते. व्हिटॅमिन ए मुळे दृष्टी सुधारते. तसेच डोळ्यांचे आरोग्य सुधारते.
Post a Comment