गावठी कट्टा डोक्याला लावून कार चालकास लुटले
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – जेसीबीचा ड्रायव्हर नगरहुन घेऊन जायचे आहे, असे सांगत कारमध्ये बसवुन 35 वर्षीय इसमास निर्जनस्थळी नेऊन गावठी कट्टा व चाकुचा धाक दाखवुन त्याच्याकडील 1 लाख 67 हजार रूपयांना लुटल्याची घटना विखे पाटील हॉस्पिटलमागील डोंगराळ भागात सोमवारी (दि.17) दुपारी 4 च्या सुमारास घडली.
हर्षद नटेश्वर सोनवणे (वय 35, रा. म्हसवड, मान, सातारा) यास दौलताडो असे नाव सांगितलेले दोन अनोळखी इसम त्याच्याकडे आले व त्यांनी जेसीबीचा ड्रायव्हर नगरहुन घेऊन जायचा आहे, असे खोटे सांगत हर्षद सोनवणे याच्या स्विट कार (क्र. एम एच 12 जी आर 4203) मध्ये बसले. त्यानंतर विखे पाटील हॉस्पिटलच्या मागे निर्जनस्थळी घेऊन सोनवणे यास घेऊन गेले. तेथे गावठी कट्टा व चाकुचा धाक दाखवत लाथाबुक्यांनी मारहाण केली. आरडाओरडा केला तर जीवे ठार मारू, अशी धमकी देत त्याच्याकडील 1 हजार रूपये किंमतीचा मोबाईल काढुन घेतला. त्याला तेथेच सोडुन त्याची 1 लाख 66 हजार रूपये किंमतीची स्विफ्ट गाडी घेऊन चोरटे पसार झाले.
या प्रकरणी हर्षद सोनवणे याने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 394, 506, आर्म अॅक्ट 3/25 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सुपनर हे करीत आहेत.
Post a Comment