'या' कारणामुळे झाली सव्वा कोटींची फसवणूक
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – गुंतवलेली रक्कम परत न देता 51 वर्षीय शेतकर्याची व अन्य गुंतवणुकदारांची फसवणुक केल्याची घटना मार्केटयार्ड येथील पोखर्णा बिल्डींग येथे 2012 ते 2017 दरम्यान घडली.
याबाबतची माहिती अशी की, राजेंद्र काशिनाथ पाचपुते (रा. रेणुकानगर, केडगाव, मुळ रा. काष्टी, ता. श्रीगोंदा) यांनी रमेशचंद्र नायक, दिनेश नायक, परमानंद प्रजापती, दीपक गेहलोत, राकेश आर्य, दिनेश बुरीया, किसन मिरावत (पुर्ण नाव व पत्ते माहित नाही) यांच्या सांगण्यावरून व जास्त व्याज मिळण्याच्या आमिषाने त्यांच्याकडे मुदतीवर पैशांची गुंतवणुक केली. मात्र मुदत संपल्यानंतर पाचपुते यांनी आपले 1 कोटी 27 लाख 61 हजार 500 रूपयेत परत मागितले असता वरील सर्वांनी ती न देता टाळाटाळ करून आपली फसवणुक केली आहे. अशी फिर्याद पाचपुते यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिली. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भंगाळे हे करीत आहेत.
Post a Comment