ब्रिटन आणि फ्रान्सला मागे टाकत भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था



माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - भारत जगातील पाचवा सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचा देश झाला आहे. भारताने २०१९ मध्ये ब्रिटन आणि फ्रान्सला मागे टाकले आहे. अमेरिकी थिंक टँक वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूने २०१९ चा अहवाल जारी केला. त्यानुसार, भारताचा जीडीपी गेल्या वर्षी २.९४ लाख कोटी डॉलरच्या स्तरावर पोहोचला. ब्रिटन २.८३ लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेसह सहावा आणि फ्रान्स २.७१ लाख कोटी डॉलरसह सातव्या क्रमांकावर राहिला. २०१८ मध्ये भारत सातव्या क्रमांकावर होता. ब्रिटन ५ वी आणि फ्रान्सची सहावी अर्थव्यवस्था हाेती.

अहवालानुसार, भारत आता जुन्या धोरणांऐवजी खुली बाजारपेठ अर्थव्यवस्थेसाठी विकसित करत आहे. भारतात १९९० च्या दशकात आर्थिक उदारीकरण सुरू झाले होते. तेव्हा उद्योगावर नियंत्रण कमी होते. विदेशी व्यापार आणि गुंतवणुकीत सूट दिली आणि सरकारी कंपन्यांचे खासगीकरण सुरू झाले होते. या कारणांमुळे भारताच्या आर्थिक विकास दरात तेजी आली. वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूनुसार, भारताचे सेवा क्षेत्र जगात तेजीने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत याचे ६०% आणि रोजगारात २८% योगदान आहे. मॅन्युफॅक्चरिंग आणि कृषीही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे क्षेत्र आहे. वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूने आकलन कशाच्या आधारावर केले हे सांगितले नाही. गेल्या वर्षीचे आकडेही सांगितले नाहीत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post