दिल्लीत हिंसाचार ; पाेलिसासह 5 ठार


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली : ‘सीएए’समर्थक अाणि विराेधी गटात साेमवारी दिल्लीत तुंबळ धुमश्चक्री झाली. दाेन्ही बाजूंनी तुफान दगडफेक करण्यात अाली. पाेलिसांसमाेर एकाने गाेळीबार केला. या हल्ल्यात हेडकाॅन्स्टेबल रतनलाल यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला. तर शाहदराचे डीसीपी अमित शर्मा, एसीपी अनुजकुमार यांच्यासह १० पाेलिस जखमी झाले. माैजपूर, कर्दमपुरी, चांदबाग, दयालपूर, भजनपुरा, जाफराबाद रोड या भागात हिंसाचार झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्या माैर्य हाॅटेलात थांबले हाेते तेथून भजनपुरा हा भाग फक्त २० किमीवर अाहे. इथे बंदाेबस्त वाढवण्यात अाला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post