महाविकासआघाडी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला - भाजपा


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - भाजपाचा विश्वासघात करून राष्ट्रवादी काँग्रेस व कॉंग्रेस बरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेची घोर निराशा करत शेतक-यांचाही विश्वासघात केला आहे. महाआघाडीच्या सरकार काळात शेकऱ्यांची फसवणूक झालीच शिवाय सर्वसामान्य जनताही असुरक्षित आहे. असा आरोप भाजपाच्या वतीने करण्यात आला आहे.

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतक-यांची फसवणूक केली असून आघाडी सरकारच्या बेफिकीरीमळे राज्यत महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. याचा निषेध करण्यासाठी नगर तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे व माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि.२५) सकाळी नगर तहसील कार्यालया समोर निदर्शने करून तहसीलदार उमेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी युवराज पोटे, श्याम पिंपळे, अमित शेडाळे, महेश लांडगे, काशिनाथ बेल्हेकर, महेश बोरुडे, संदीप म्हस्के, गणेश वाकळे, विजय गाडे, गोवर्धन शेवाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शेतक-यांच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना २५ हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी ५० हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती. पण महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुखांना आपल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. सरसकट कर्जमाफी करु, सातबारा कोरा करु अशा घोषणा करणा-या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यापैकि एकही आश्वासन पाळलेले नाही. सरकारी कर्जमाफी योजनाही शेतक-यांची सरसकट फसवणूक करणारी आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतक-यांची फक्त अल्प मुदतीची पीक कर्जे माफ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बहुसंख्य शेतक -यांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही. दोन लाखांवर कर्ज असलेल्या तसेच कर्जाची नियमित परतफेड करणा-या शेतक-यांबाबत महाविकास आघाडीच्या कर्जमाफी योजनेत कसलाच उल्लेख नाही. भाजपा सरकारच्या कर्जमाफीत पीक कर्ज. तसेंच मध्यम मुदतींचे कर्ज समाविष्ट केल्याने पॉलीहाऊस, रोडनेट, शेती उपकरणे, पशुपालन, शेळी पालन, मधमाशी पालन अशा सर्व प्रकारच्या शेतक-यांना लाभ मिळाला होता. भाजप सरकारच्या व्यापकं कर्ज माफीमुळे ४३ लाख खाते धारकांना १९ हजार कोटींचा लाभ देण्यात आला होता. तूर खरेदीचे निकष महाविकास आघाडी सरकारने बदलल्यामुळे शेतक-यांकडून होणा-या खरेदीचे प्रमाण खूप कमी झाले आहे. शेतक-यांची घोर फसवणूक करणा-या महाविकास आघाडी सरकारचा
भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करीत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post