जगातील सर्वांत वयोवृद्ध महिलेचे निधन


माय अहमदनगर वेब टीम
टोकियो : फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच जगातील सर्वांत वयोवृद्ध म्हणून 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद झालेल्या जपानमधील चितेस्तू वातानाबे यांचे रविवारी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ११२ वर्षे होते. आपले हास्य हेच दीर्घायुष्याचे रहस्य असल्याचे वातानाबे यांनी १२ फेब्रुवारीला 'गिनीज'चे प्रमाणपत्र स्वीकारताना नमूद केले होते. मात्र, अलिकडे त्यांना ताप येऊ लागला व श्वासोच्छवासातही त्रास होऊ लागला. त्यांना व्यवस्थितपणे खाताही येत नव्हते. अखेर रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

१९०७ मध्ये जन्मलेल्या वातानाबे यांनी तैवानमध्ये १८ वर्षे नोकरी केली. त्यानंतर त्यांनी निवृत्तीपर्यंत सरकारी नोकरी केली. त्यांना शेतीची आवड होती. कुटुंबाच्या शेतात ते फळे आणि भाज्यांची शेती करीत. वातानाबे यांच्या पश्चात पाच मुले, १२ नातवंडे आणि पतवंडे आणि एक खापरपणतू असा परिवार आहे. दरम्यान, जगातील सर्वांत वयोवृद्ध महिलादेखील जपानी नागरिक आहे. केन तनाका असे त्यांचे नाव असून, त्या ११७ वर्षांच्या आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post