महिला टी-20 वर्ल्ड ; भारताची हँट्रिक


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली- महिला टी-20 वर्ल्ड कपमधील ग्रुप सामन्यात भारतीय संघाने न्यूजीलँडला 3 धावांनी पराभूत करुन उपांत्या फेरी गाठली आहे. आज(गुरुवार) मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट गमावून 133 धावा काढल्या होत्या. हे लक्ष गाठण्यासाठी मैदानात उतरलेला न्यूजीलँड संघ 6 विकेटवर फक्त 130 धावांची मजल मारू शकला. भारताचा टूर्नामेंटमध्ये सलग तिसरा विजय आहे. भारताने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 17 आणि नंतर बांग्लादेशला 18 धावांनी पराभूत केले होते.

भारताकडून ओपनर शेफाली वर्माने सर्वात जास्त 46 धावा आणि तानिया भाटियाने 23 धावा काढल्या. सामन्यात सेफालीला प्लेयर ऑफ द मॅच ठरवण्यात आले. तर, न्यूजीलँडसाठी अमेलिया केर आणि रोजमैरी मैरने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. कर्णधार सोफी डेवाइन, ली तहूहू आणि लैग कस्पेरेकला प्रत्येकी 1-1 विकेट्स मिळाल्या.

भारत ग्रुप-ए मध्ये अव्वल स्थानी
भारतीय संघ आपले तिन्ही सामे जिंकून ग्रुप-ए मध्ये 6 पॉइंटसोब अव्वल स्थानावर आहे. संघाचे नेट रन रेट 0.633 आहे. यासोबतच भारत उपांत्य फेरीत जागा मिळवणारा पहिला देश आहे. तर, न्यूजीलँड दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या नंबरवर आहेत. दोन्ही संघाने 2 पैकी 1-1 सामना जिंकला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post