पत्नी व सासरच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या


माय अहमदनगर वेब टीम
श्रीगोंदा :- श्रीगोंदे तालुक्यातील येळपणे येथील तरुण युवक अमोल चंद्रकांत शिंदे याने आपल्या पत्नीच्या व सासरच्या त्रासाला कंटाळून आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की अमोल चंद्रकांत शिंदे हा अतिशय सामान्य परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करून आपल्या नातेवाइकांच्या मदतीने सुरत या ठिकाणी व्यवसाय करू लागला.तसेच अमोल हा व्यवसायामुळे सुरत या ठिकाणी राहत असे.अमोल हा अत्यंत गरीब कुटुंबातुन आपले शिक्षण घेऊन नावलौकीक करणारा युवक होता.त्यानंतर अमोलचे दीड वर्षांपूर्वी आढळगाव येथील दादा दत्तू मेटे यांची मुलगी काजल हिच्यासोबत त्याचा विवाह झाला होता. विवाहानंतर अमोल हा त्याच्या पत्नी सोबत व्यवसायासाठी सुरत येते राहत होता.लग्नाला काही दिवस झाल्यानंतर त्याची पत्नी काजल ही अमोलशी घरगोती कारणावरून अमोलशी भांडण करत होती.त्याची पत्नी काजल ही आपल्या आई, वडील ,भाऊ व आत्या यांच्या सांगण्यावरून अमोलला मानसिक त्रास करत होती.अमोलची त्याची पत्नी काजल हिच्याशी अनेक वेळा भांडण झाले होते. ज्या ज्या वेळेस भांडण झाले त्या त्या वेळेस अमोलला त्याच्या सासू सासऱ्यानी धमकावून आपल्या मुलीला घेऊन गेले होते.तसेच सासरे दादा दत्तू मेटे सासू निर्मला दादा मेटे मेहुणी सोनी सुदाम गायकवाड मावळण सासू रुक्मिणी संतोष जाधव हे वेळोवेळी फोन करून व कधी प्रत्यक्षात अमोल यास शिवीगाळी व दमदाटी करत असत

अमोल हा नुकताच येळपणे गावच्या यात्रेनिमित्त गावाकडे आला होता.अमोल हा आपल्या पत्नीला यात्रेसाठी माहेराहून घेऊन आला होता. तसेच २३ फेब्रुवारी रोजी सकाळी काजल हिने कुठले कारण नसताना भांडण केले वतू सुरतला राहिलास तरच मी तुझ्याबरोबर संसार करेल अन्यथा नाही भांडण झाल्यावर काजल ने आपले वडील दादा दत्तू मेटे यांस बोलावून घेतले व सासरे आल्यावर त्यांनी सर्व समक्ष अमोल यास शिवीगाळ केली. अमोल त्यांना त्यावेळी म्हणाला तुम्ही माझ्या सुखी जीवनाचे वाटोळे केले आहे. तुम्हाला तुमचा मुलगा अमोल दादा मेटे याच्या लग्नात दिलेले २लाख ७० हजार रुपये अध्याप दिले नाहीत. त्यातील ७० हजार रुपये माझ्या आईच्या दुखण्याच्या वेळेस दिले बाकी रक्कम कधी देणार तीमी नकेश जगताप यांच्याकडून उसने घेऊन दिली आहे त्यामुळे उर्वरित रक्कम लवकर देण्यात यावी. त्यावेळेस दादा दत्तू मेटे यांनी अरेरावी करत शिवीगाळ करत काजल हिला दुचाकीवरून घेऊन जात असताना अमोल याला म्हणाले की तू मेला तरी तुझ्या मैतिला सुद्धा येणार नाही. त्यानंतर काही काळात अमोलने एक एक चिठ्ठी लिहिली होती.त्या चिठ्ठीमध्ये पत्नी काजल ,सासरे दादा दत्तू मेटे, सासू निर्मला दादा मेटे, मेहुणी सोनी सुदाम गायकवाड ,मावळण सासू रुक्मिणी संतोष जाधव यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे. मी आईवडिलांची सेवा करू शकत नाही याची मला खंत वाटते असा मजकूर लिहून घरातील छताला फाशी घेतली बेलवंडी पोलीस स्टेशन येथे पत्नी काजल अमोल शिंदे, सासरा दादा दत्तू मेटे रा. आढळगाव ता. श्रीगोंदे. जि. अहमदनगर , सासू निर्मल दादा मेटे, मेहुणी सोनी सुदाम गायकवाड रा. थेरगाव ता कर्जत, मावळण रुक्मिणी संतोष जाधव रा. चोराचीवडी ता. श्रीगोंदे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल अशी फिर्याद मिना चंद्रकांत शिंदे यांच्याकडून देण्यात आली. त्यानुसार बेलवंडी पोलीस ठाण्यात भादवि क्र ३०६,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद माने करत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post