दिल्ली हिंसाचारातील बळींचा आकडा ३४ वर


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली : रविवारपासून ईशान्य दिल्लीत सुरु असलेला हिंसाचार आता थांबला असून या भागातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, या हिंसाचारामधील मृतांचा आकडा आता ३४वर पोहोचला आहे. यांपैकी दोघांचे मृतदेह एका नाल्यामध्ये सापडले आहेत. दरम्यान, प्रक्षोभक भाषणं करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करावेत किंवा नाहीत यावर आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींनी राष्ट्रपती रामनात कोविंद यांची भेट घेतली.

दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी दिल्ली हायकोर्टात सुरु असलेल्या हिंसाचाराच्या खटल्यात सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एम. के. आचार्य, अमित महाजन आणि रजत नायर यांना दिल्ली पोलिसांचे वकील म्हणून नियुक्त केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post