अबब! बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या सासूला तीन कोटींचा दंड


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची सासू सविता छिब्बा यांच्या फार्म हाउसवर ३ कोटी रुपयांचा दंड आकरण्यात आला आहे. शाहरुखची सासू सविता आणि मेहूणी नमिता छिब्बा हे डेजा वू फार्म्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. अलिबागमध्ये एका आलिशान बंगल्यासह त्यांचा हा फार्म हाउस आहे. यावर आता बॉम्बे टेनन्सी कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

२००८ मध्ये तयार करण्यात आलेल्या या बंगल्यात अनेत बॉलिवूड पार्ट्या झाल्या आहेत. शाहरुखने त्याचा ५२ वा वाढदिवस याच बंगल्यावर साजरा केला होता. मुंबई मिररने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार २९ जानेवारी २०१८ मध्ये फार्म हाउसला जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी नोटीस पाठवली होती. या नोटीसमध्ये स्पष्ट लिहिण्यात आले होते की, प्लॉट विकत घेतल्यानंतर तेव्हाचे रायगडमधील अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी १३ मे २००५ रोजी या जमिनीवर शेती करण्याची परवानगी दिली होती.

या नोटीसमध्ये लिहिलं गेलं की, फार्महाउस तोडून तिथे नवीन फार्महाउस बांधल्याने बॉम्बे टेनेन्सी कायद्याच्या कलम ६३ चं उल्लंघन आहे. यासंदर्भात फार्महाउसच्या संचालकांना समन्स पाठवण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई का झाली नाही असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला आहे. काही सुनावण्यांनंतर २० जानेवारी २०२० ला अजून एक नोटीस पाठवण्यात आली, ज्यात कायदा उल्लंघनबद्दल स्पष्ट सांगण्यात आले. तसेच ३ कोटी ९ लाख रुपयांचा दंड लवकरात लवकर भरण्यासही सांगण्यात आले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post