ठाकरे सरकारची मोठी घोषणा ; शिक्षण क्षेत्रात मुस्लिमांना 5% आरक्षण


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- राज्यातील महाविकासआघाडी सरकार पुढील शैक्षणिक वर्षापासून मुस्लिमांना शिक्षण क्षेत्रात 5% आरक्षण देण्याच्या तयारीत आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज(शुक्रवार) विधानसभेत बोलताना ही माहिती दिली. नवाब मलिक राज्यातील सध्याच्या मुस्लिम आरक्षणावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, खासगी शाळा-कॉलेजमध्ये आरक्षण लागू करण्यासाठी सध्या विचार सुरू आहे. यासोबतच ठाकरे सरकार खासगी संस्थांमध्येही कायदा आणण्याच्या विचार आहे. लवकरच याबाबतीत योग्य निर्णय घेतला जाईल."

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post