सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ; 29 फेब्रुवारीपासून पाच दिवसांचा आठवडा


प्रस्तावाला राज्य मंत्री मंडळाची मंजुरी

माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- राज्य सरकारी कर्मचार्‍यांना महाविकास आघाडी सरकारने खुशखबर दिली असून पाच दिवसांच्या आठवड्यास बुधवारी (दि.12) झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचार्‍यांना आता शनिवार व रविवार असे दोन दिवस सुटी मिळणार आहे. येत्या 29 फेब्रुवारी पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

सरकारी कार्यालयांचे कामकाज सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस सुरू ठेवावे आणि शनिवार व रविवार सुटी द्यावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून विविध कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत होती. या मागणीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक भूमीका घेतली होती. कर्मचार्‍यांना खुश करण्यासाठी बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत पाच दिवसांच्या आठवड्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचार्‍यांना आता सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस कार्यालयीन कामकाज राहणार आहे. तर शनिवार व रविवार सुटी असणार आहे. मात्र, हा निर्णय घेताना पाच दिवसांच्या कालावधीतील कार्यालयीन कामकाजाची वेळ वाढविण्यात येणार आहे. तसेच अत्यावश्यक वेळी कर्मचार्‍यांना सुटीच्या दिवशीही कामकावर हजर रहावे लागणार आहे. येत्या 29 फेब्रुवारी पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post