मुंबई हल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद दोषी ; सुनावला 5 वर्षांचा तुरुंगास


माय अहमदनगर वेब टीम
इस्लामाबाद- पाकिस्तानातील एका न्यायालयाने मुंबई हल्याचा मुख्य आरोपी आणि जमात-उद-दावा संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदला टेरर फंडिंग प्रकरणात दोषी ठरवत, 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सईदविरोधात दहशतवाद फंडिंग, मनी लॉन्ड्रिंग आणि अवैधरित्या कब्जा करणे इत्यादी 29 प्रकरणे दाखल आहेत.

सईदवर मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये पाकिस्तानच्या न्यायालयाने टेरर फंडिगचे आरोप लावले होते. त्यापूर्वी, 3 जुलैला पंजाब प्रांतातील पोलिसांनी हाफिज आणि त्याच्या 13 साथीदारांविरोधात 13 प्रकरणे दाखल केली होती. हाफिजवर आपल्या एनजीओच्या माध्यमातून दहशतवादी कारवाया करण्याचा आरोप आहे.


हाफिज सईदला 2019 जुलैमध्ये तुरुंगात टाकले होते
अॅटी टेररिज्म कोर्ट (एटीसी)ने त्याच्या 4 साथीदारांवरही आरोप सिद्ध केले होते. त्या सर्वांविरोधात अँटी टेरेरिज्म अॅक्ट 1997 अंतर्गत, टेरर फंडिंग आणि मनी लॉन्ड्रिंग सारखे गुन्हे दाखल होते. हाफिज सईदला 17 जुलैला अटक झाली होती, तेव्हापासून तो लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात बंद आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post