दुचाकी, मोबाईल चोराच्या मुसक्या आवळल्या


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - शहरातील पाईपरोड परिसरातून दुचाकी, मोबाईल चोरणारा चोरटा जेरबंद करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे. किरण बन्सी दळवी (वय २६, रा.जयमल्हारनगर, नगर निबंळक, जि.अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, पाईपलाईनरोड यशोदानगर, भाजीमार्केट येथे दुचाकी, मोबाईल चोरट्याचा शोध घेतला. या दरम्यान, संशयास्पद विना नंबर असणाऱ्या दुचाकीवरून फिरताना दिसून आला. त्या संशयितास ताब्यात घेतले असता, त्याला पोलीस खाक्या दाखवताच दुचाकी ही दि.२ फेब्रुवारीस पाईपलाईन रोड येथून चोरल्याचे सांगितले. तसेच त्याने अनेक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्या कडून ७ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, शहर उपविभागीय अधिकारी संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पो.नि.हारुण मुलाणी यांनी दिलेल्या सूचनेनुसार पासई समाधान सोळंके, पोना अविनाश वाकचौरे, वसिमखान पठाण, अहमद इनामदार, दीपक जाधव, ज्ञानेश्वर मोरे, पोकाँ सचिन जगताप, शिरिष तरटे, दत्तात्रय कोतकर, प्रशांत राठोड, राहुल गुंड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post