अहमदनगरमध्ये 'या' कारणामुळे घरात घुसून मारहाण


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – घरात घुसुन विनाकारण 6 जणांच्या टोळक्याने लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यावेळी त्यांना शिवीगाळही करण्यात आली. ही घटना पाईपलाईन रोडवरील पुरोहित स्विटस्जवळ सोमवारी (दि.10) रात्री 8.45 च्या सुमारास घडली.

याबाबतची माहिती अशी की, हेमंत दिलीप शर्मा (वय-19, रा. पंचवटीनगर, पाईपलाईन रोड) हे त्यांच्या घरात असताना मोन्या जोशी, सोन्या जोशी, बबलु जरे, सागर गाणार, दिनेश यादव, अजित बाबर (पुर्ण नाव माहित नाही. सर्व रा. पाईपलाईन रोड, पंचवटी नगर) हे बळजबरीने घरात घुसले व शर्मा याला शिवीगाळ करू लागले. या दरम्यान हेमंतची आई, वडिल व बहिण मध्ये आले असता या सहा जणांनी शर्मा कुटुंबातील सर्वांनाच शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली.

याप्रकरणी हेमंत शर्मा याने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 143, 147, 452, 323, 504, 506 प्रमाणे मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post