आंतरजातीय प्रेमप्रकरणामुळे आई-वडिलांनी मुलीला गळा दाबून मारले


माय अहमदनगर वेब टीम
भुसावळ -जळगाव जिल्ह्यातील तळवेल गावात ऑनर किलिंगची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी मुलीच्या आई-वडिलांना अटक करण्यात आली आहे. आपल्या अल्पवयीन मुलीच्या आंतरजातीय प्रेमप्रकरणाची माहिती मिळताच आई-वडिलांनी तिचे दुसऱ्या मुलाशी लग्न ठरवले. त्या मुलीने ही माहिती प्रियकराला दिली. त्याने भुसावळ न्यायालयात बालविवाह होत असल्याची तक्रार दिली. कोर्टाने तिच्या आई-वडिलांना २० राेजी हजर राहण्याची नोटीस बजावली. आपल्यावर कारवाई व समाजात बदनामी होईल, याचा राग आल्याने आई-वडिलांनी आपल्या १७ वर्षे ६ महिने वयाच्या मुलीला झोपेतच नाक, तोंड व गळा आवळून ठार मारल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. १९) तळवेल गावात घडली.

मुलीचे वडील सुधाकर मधुकर पाटील (४६) व आई नंदाबाई सुधाकर पाटील (४०, रा. तळवेल) यांच्याविरुद्ध कलम ३०२, ३४ बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००७ कलम ११ प्रमाणे गुन्हा दाखल झाला.त्यांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दोघांनीही खुनाची कबुली दिली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post