देश शहीदांचे बलिदान कधीच विसरणार नाही- पंतप्रधान
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली- पुलवामा हल्ल्यालाएक वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी ट्वीट केले, "मागच्या वर्षी पुलवामा हल्यात शहीद झालेल्या जवानांना माझी श्रद्धांजली. ते सर्व असाधारण व्यक्ती होते, ज्यांनी आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी आपले जीवन अर्पण केले. देश त्यांचे बलिदान कधीच विसरणार नाही." दुसरीकडे, राहुल गांधींनी शहीद सीआरपीएफ जवानांचे स्मरण केले आणि या घटनेवरुन सरकारला तीन प्रश्न विचारले.
राहुल गांधीनी पहिला प्रश्न केला की, या हल्ल्यामुळे सर्वात जास्त कोणाला फायदा झाला? दुसरा, हल्ल्यानंतर झालेल्या चौकशीचा परिणाम काय झाला आणि तिसरा, भाजप सरकारने या हल्ल्यातझालेल्या चुकीबद्दल कोणाला जबाबदार ठरवले? संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील आजच्या दिवशी शहीदांचे स्मरण करुन त्यांचे बलिदान कोणीच विसरणार नाही, असे ट्वीट केले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली.
Post a Comment