कोरोनाचा हाहाकार ; चीनमध्ये एका दिवसात २४२ जणांचा मृत्यू
माय अहमदनगर वेब टीम
बीजिंग -चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संसर्ग रोखण्यासाठी शहरांना सील केले असल्याने अनेक शहरांतील लोकांना कारागृहासारख्या स्थितीचा सामना करावा लागत आहे. याचा परिणाम नेत्यांवरही होऊ लागला आहे. कोरोना व्हायरसचे केंद्र हुबेई राज्याचे वरिष्ठ राजकीय नेत्याला बडतर्फ करण्यात आले आहे. हुबेईतील पक्षाचे सचिव जियांग चोलियांग यांना हटवण्यात आले असून त्यांच्या जागेवर शांघायचे महापौर यिंग योंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हुबेईमध्ये या आजाराने १३५५ जणांचा मृत्यू झाला आहे. हुबेई राज्यात एकाच दिवसात २४२ जणांचा मृत्यू झाला. तर, १४ हजार ४८० नवी प्रकरणे समोर आली आहेत. आजार समोर आल्यानंतर एक दिवसात झालेल्या मृत्यूचा हा सर्वात मोठा आकडा अाहे. जगभरात यामुळे आतापर्यंत १३५० मृत्यू झाले असून ६० हजारांपेक्षा जास्त संक्रमित आहेत.
Post a Comment