निर्भया प्रकरण : चारही आरोपींना 3 मार्चला फाशी


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - निर्भया प्रकरणात पतियाळा हाउस कोर्टाने आज चारही दोषींसाठी तिसरा डेथ वॉरंट जारी केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी दिलेल्या आदेशानुसार, या चौघांना येत्या 3 मार्च रोजी सकाळी 6 वाजता फाशी दिली जाणार आहे. यातील एक गुन्हेगार विनय शर्मा तिहार तुरुंगात उपोषणावर बसल्याची कोर्टाला माहिती देण्यात आली. तर दोषी अक्षय ठाकूरच्या वकिलांनी सांगितल्याप्रमाणे, अक्षयने राष्ट्रपतींकडे नव्याने दया याचिका पाठवण्याची तयारी सुरू केली आहे.

यासंदर्भात सोमवारी सकाळी सुनावणीच्या वेळी दोषी मुकेश सिंहने कोर्टाला सांगितले, की वृंदा ग्रोव्हर यांनी त्याची वकिली करू नये. यानंतर कोर्टाने त्याच्यासाठी वकील रवी काझी यांची नियुक्ती केली. विनयच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले, की विनय मानसिकरित्या आजारी आहे. त्यामुळे, त्याला फाशी दिली जाऊ शकत नाही. दोषी पवन गुप्ताच्या वकिलांनी कोर्टात म्हटले, की पवनने सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पेटिशन आणि राष्ट्रपतींकडे दया याचिका करण्यास इच्छुक आहे. चार गुन्हेगारांपैकी केवळ एक पवनकडे अजुनही क्यूरेटिव्ह पेटिशन आणि दया याचिका करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post