केडगावमधील पुल व रस्त्यासाठी आमदार संग्राम जगताप यांना साकडे : नगरसेवक मनोज कोतकर


माय अहमदनगर वेेेब टीम
अहमदनगर : केडगाव प्रभाग क्र. १७ मधील केडगाव देवी रोड, मतकर वस्तीजवळील व केडगाव-अरणगाव रस्त्यावरील सरोदेमळा रोडवर छोटे पूल असून, सदरील पुलाची उंची कमी असल्यामुळे व दोन्ही पुलाखाली पाईपलाईन टाकलेल्या असल्यामुळे पावसाचे पाणी प्रवाहीत होत नाही. त्यामुळे ते पाणी पुलावरुन वाहत असल्यामुळे येणाऱ्या व जाणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच पुलावरील पाणी आजूबाजुच्या परिसरातल नागरिकांच्या घरामध्ये शिरते. यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे दोन्ही मार्ग रहदारीसाठी बंद होतात. एकवेळेस तीन व्यक्ती या मुसळधार पावसामध्ये पुलावरुन वाहून गेलेले आहे. अशा प्रकारच्या अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत. केडगाव-अरणगाव हा अत्यंत
महत्त्वाचा रस्ता असून, या रस्त्यावरुन मोहिनीनगर, दूधसागर, आदर्शनगर व अरणगाव परिसरातील नागरिक या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहे. अरणगाव येते मेहेरबाबांची मोठी समाधी स्थळ असून, ते भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे या ठिकाणी भाविक-भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात. तसेच सदरली रस्त्यावर खड्डे पडलेले असून नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे सदरील रस्त्याचे व दोन्ही पुलांचे काम तातडीने मार्गी लावण्यात यावे, अशा आशयाची मागणी निवेदनाद्वारे शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडे प्रभाग क्र. १७ चे नगरसेवक मनोज कोतकर यांनी केले आहे. तरी लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावी, अशी विनंती यावेळी त्यांना करण्यात आली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post