टायर्सचे दुकान फोडणाऱ्या टोळीला 24 तासांच्या आत बेड्या


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - केडगाव परिसरात टायरचे दुकान फोडणारी टोळी 24 तासांच्या आत कोतवाली पोलिसांनी जेरबंद केली आहे. सहा जणांना ताब्यात घेतले असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये मनोज उत्तम बोठे (वय २२ वर्ष. रा. पारगाव मौला, ता. नगर), अभिषेक अर्जुन करंजुले (वय २० वर्ष, रा. पंचशील हाँटेल मागे, पाडळी रांजणगाव, सुपा, ता. पारनेर), बाळासाहेब रामभाऊ पुंड (वय ४० वर्ष, रा शिंगवे तुकाई, ता. नेवासा) यांचा समावेश आहे.

याबाबत समजलेली माहिती शहरातील केडगाव मध्ये प्रितम संजय बाफना (रा. समर्थनगर लिंगरोड अहमदनगर केडगाव जि अहमदनगर ) यांचे पुणे महामार्गावरील केडगाव शिवारात हाॅटेल अरुणोदय शेजारी अरिहंत टायर्स दुकानात २४ तासापूर्वी फोडले होते. दुकानाच्या मागील बाजूचा पत्रा उचकाटून दुकानातील एमआरएफ अपोलो. मिसलीन. सिएट. राल्को. टिव्हीएस. जे.के. के लिमलाॅग. या कंपनीने ५१५ टायसॅ व दुचाकी व चारचाकी वाहनांच्या ७५० रबर ट्युब असा ९.४७.३०० रुपये किंमतीचे माल अज्ञात चोराने चोरुन नेल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानुसार तपास सुरु असताना चोरीतील टायर्स सुपा येथे विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. यानंतर सुपा येथे कोतवाली गुन्हे शाखेने सापळा लावून मनोज बोठे, अभिषेक करंजुले, बाबासाहेब पुंड व तिघा अल्पवयीन मुलांना पकडण्यात आले. यावेळी त्याच्या ताब्यातून ६ लाख १८ हजार रुपयांचे दुचाकीचे ४४५ नवीन टायर्स, १ लाख ५७ हजार ५०० रुपये चारचाकी गाड्यांचे टायर्स, ८६ हजार ८०० रुपयांची ६२० दुचाकीच्या ट्यूब, ४५ हजार रुपयांच्या १००चारचाकी गाड्यांच्या ट्यूब, २४ हजार ५०० रुपयांचे ४ मोबाइल, १० लाख रुपयांची पिकअप गाडी, ३ लाख रुपयांचा छोटा हत्ती, ४० हजार रुपयांची सीडी डिल्कस दुचाकी असा एकूण २२ लाख ७१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके, कोतवाली पोलिस ठाण्याचे पो.नि.विकास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे डिबीचे उ.पो.नि. सतिष शिरसाट, पोना गणेश धोत्रे, शहीद शेख, नितीन शिंदे, भारत इंगळे, सुजय हिवाळे, पोकाँ पी आर राठोड आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post