मलायका अरोराच्या फोटोवर फराह खानने दिली शिवी


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : मलायका अरोरा सोशल मीडियावर किती सक्रिय असते हे नव्याने सांगायची गरज नाही. असा एकही दिवस जात नाही की ती इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर करत नाही. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करताच अवघ्या काही मिनिटांत फोटो व्हायरल होतात.

तिच्या प्रत्येक फोटोवर फक्त सेलिब्रिटीच नाही तर तिचे चाहतेही भरभरून कमेन्ट करतात. नुकतेच मलायकाने तिचे काही फोटो शेअर केले. या फोटोत मलायकाने हाय स्लिट ड्रेस घातला होता. या ड्रेसमध्ये ती फार ग्लॅमरस दिसत होती यात काही शंकाच नाही. फॅशन डिझायनर जॉर्ज चक्राच्या ट्रँगरीन रंगाच्या गाउनला पसंती दिली होती. मलायकाने या आउटफिटमधील तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअरही केले. दरम्यान, कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानने मलायकाच्या या ड्रेसवर कमेन्ट केली आहे. विशेष म्हणजे या कमेन्टमध्ये तिने शिवीही दिली.


फराह खानने थट्टेत मलायकाला म्हटलं की, 'नालायक मुली आज रात्रीच्या गेम पार्टीत हा ड्रेस नक्की घालून ये.' फराहच्या या कमेन्टवर आता अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, हे साऱ्यांनाच कळले की फराहने तिच्या कमेन्टमधून मलायकाच्या सौंदर्याचं कौतुकच केलं. दरम्यान, सध्या मलायका अरोरा तिच्या कामापेक्षा खासगी आयुष्यामुळेच जास्त चर्चेत आहे.


असं म्हटलं जातं की, अर्जुनसोबतच्या नात्यामुळेच मलायकाने अरबाजला घटस्फोट दिला होता. दोघांच्या घटस्फोटानंतर मलायका आणि अर्जुनने ते रिलेशनशिपमध्ये असल्याचं मान्य केलं होतं. आपलं नातं मान्य केल्यानंतर अर्जुन आणि मलायका एकमेकांसोबतचे अनेक फोटो शेअर करत असतात. याशिवाय दोघं अनेकदा पार्टी आणि कार्यक्रमांना एकत्र जाताना दिसतात. दोघं लवकर लग्न करणार असल्याचं म्हटलं जात होतं मात्र अर्जुनने त्यांच्या लग्नाला अजून वेळ असल्याचं सांगितलं.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post