धक्कादायक! बापाकडून मुलीवर अत्याचार


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई -पुरोगामी विचारांचा वारसा जोपासणाऱ्या महाराष्ट्राने गेल्या काही वर्षांपासून लेक वाचवा लेक शिकवाची मुहूर्तमेढ रोवली असताना गेल्या काही महिन्यांपासून महिलांवरील व बलिकांवरील अत्याचार दिवसागणिक वाढतच आहे, परिणामी हे अत्याचार साधुसंतांच्या महाराष्ट्र भूमीला न शोभणारे नसून पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासाला काळिमा फासणारी दुर्दैवी घटना खामगाव तालुक्यातील व पिंपळगाव राजा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम हिवरा खुर्द येथे घडला.

नात्याने स्वतः चा बाप असलेला नराधम अंकुश किसनराव बघे हा स्वतः च्या मुलीवर गेल्या एक वर्षांपासून सातत्याने लैंगिक शोषण करीत अत्याचार करीत असल्याचे बिंग (दि.22फेब्रुवारी) रोजी फुटले. बापाच्या सततच्या अत्याचाराने हैराण व त्रस्त झालेल्या 16 वर्षीय अल्पवयीन बालिकेने अखेर पिंपळगाव राजा पोलिस ठाणे गाठून झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती ठाणेदार सचिन चव्हाण यांच्यासमोर कथन केली,त्यामुळे सचिन चव्हाण यांनी तपासाची गती वाढवून सदर अत्याचाराला बळी पडलेल्या बलिकेला न्याय मिळवून देण्यासाठी आपली तपासचक्रे फिरवली व आरोपी बाप अंकुश बघे यास अखेर बेड्या ठोकल्या.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post