बालिकाश्रम रोडवरुन कारची चोरी


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- रात्रीच्या वेळी घरासमोर उभी केलेली 4 लाख रुपये किंमतीची मारुती सुझुकी कंपनीची कार अज्ञात चोराने चोरुन नेली. ही घटना बालिकाश्रम रोडवरील सुडके मळा येथील सुरेश अपार्टमेंट येथे सोमवारी (दि.24) रात्री 11 वाजता घडली. प्रविण रामदास धोंडे (वय 34, रा.समर्थ सोसायटी, विजापूर रोड, सोलापूर) यांनी त्यांची 4 लाख रुपये किंमतीची मारुती सुझुकी ही कार चोरुन नेली. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी प्रविण धोंडे यांच्या फिर्यादीवरुन भा.दं.वि.क. 379 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून तपास पोलीस नाईक जी. डी. चौधरी करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post