अहमदनगरमध्ये शॉर्टसर्किटमुळे गादी कारखान्याला भीषण आग


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - नगर- औरंगाबाद रोड वर एन आर लॉन्स समोर एका गादीच्या कारखान्याला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना आज सायंकाळच्या वेळी घडली असून या आगीमध्ये गाद्या पूर्ण जळून खाक झाल्या. आग लागल्यामुळे कारखान्यात असलेली गॅस टाकीचा स्फोट झाला. या कारखान्याच्या शेजारी राहत असलेल्या महिलांना आग लागल्याचे माहीत होताच दोन महिलांनी मुलांना घेऊन घराबाहेर धाव घेतली. यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही व सुदैवाने मोठा अनर्थ टळला. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी व महापालिकेतील अग्निशामक दलाची गाड्या फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचा प्रयत्न चालू आहेत. या आगीमध्ये कारखान्याच्या आजूबाजूच्या चार ते पाच टप-या होत्या. त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग लागल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर मोठी गर्दी केली होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post