आश्चर्य : दोन पुरुषांनी केला एका महिलेवर पत्नी असल्याचा दावा


माय अहमदनगर वेब टीम
भोपाळ : भोपाळमधील पोलीस ठाण्यात एक असं प्रकरण आलं जे पाहिल्यानंतर पोलीसही चक्रावले. झालं असं की, दोन व्यक्ती आपण महिलेचे पती असल्याचा दावा करत पोलीस ठाण्यात पोहोचले होते. एकाच महिलेवर दोघांनी दावा केल्याने पोलिसांनाही नेमकं काय सुरु आहे कळत नव्हतं. सेल्समन असणाऱ्या एका पतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत दुसरा व्यक्ती आपल्या पत्नीला फोन करुन वारंवार त्रास देत आहे, तसंच आपली पत्नी असल्याचा दावा करत असल्याची तक्रार दिली. ज्याच्यावर आरोप करण्यात आले होते, त्याने केलेल्या दाव्यानुसार २००५ मध्ये जेव्हा महिला १८ वर्षांची होती तेव्हा आपलं लग्न झालं होतं. तसंच आपल्याला दोन मुली असल्याचाही दावा त्याने केला आहे.

दाव्यानुसार, पत्नी वारंवार त्याची फसवणूक करत आहे. याआधी अनेकदा ती घरातून पळून गेली होती. दोन वेळा त्यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. यावेळी जेव्हा ती घरातून पळून गेली तेव्हा ती एका दुसऱ्या व्यक्तीसोबत राहत असल्याची माहिती मिळाली.

महिलेने मात्र जी व्यक्ती पती असल्याचा दावा करत आहे त्याला आपण भाऊ मानत असल्याचं म्हटलं आहे. त्याच्या पत्नीचं निधन झाल्याने मुलींचा सांभाळ करण्यासाठी काही दिवस त्याच्यासोबत राहत होतो असंही तिने सांगितलं आहे. दरम्यान दुसऱ्या व्यक्तीने दावा केला आहे, २०१५ मध्ये महिलेसोबत त्याचं लग्न झालं. त्याने पोलिसांना कागदपत्रंही दाखवली. त्यावेळी महिलेचं वय २१ असल्याचं त्याने सांगितलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post