2 प्रशिक्षणार्थी सहायक आयुक्तांना प्रभाग अधिकारीपदी नियुक्ती


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- महापालिकेत नव्याने रुजू झालेले सहायक आयुक्त संतोष लांडगे व दिनेश सिनारे यांना अनुक्रमे प्रभाग समिती क्रमांक 3 व प्रभाग समिती क्रमांक 2 येथे प्रभाग अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. या दोन्ही पदांवर काम करणारे अनुक्रमे अशोक साबळे यांना मूल्य निर्धारण कर संकलन विभागात सहायक आयुक्त म्हणून तर अंबादास सोनवणे यांना महापालिका बांधकाम विभागात अधीक्षक म्हणून नियुक्ती दिली गेली आहे.

परीविक्षाधीन प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी गट-ब संवर्गातील उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव मिळण्यासाठी ऑन फिल्ड ट्रेनिंग स्वरूपात नियुक्त्या दिल्या जातात. 10 फेब्रुवारीच्या शासन आदेशानुसार महापालिकेत सहायक आयुक्त या पदांवर ऑन फिल्ड ट्रेनिंग स्वरूपात दिनेश सिनारे व संतोष लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना महापालिकेच्या कामकाजाचा अनुभव घेता यावा म्हणून अनुक्रमे प्रभाग समिती दोन व प्रभाग समिती 3 येथे प्रभाग अधिकारी म्हणून नियुक्ती दिली गेली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post