कोरोना : राज्यात 77 जणांचे नमुने निगेटीव्ह; चारजण निरीक्षणाखाली


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात 77 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनासाठी निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेल्या 77 जणांपैकी 73 जणांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या मुंबई आणि पुणे येथे प्रत्येकी दोनजण निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दि. 21 फेब्रुवारीपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 44 हजार 517 प्रवासी तपासण्यात आले आहेत. बाधीत भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधीत भागातून 279 प्रवासी आले आहेत. त्यापैकी 170 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.

आजपर्यंत राज्यात 77 जणांना भरती करण्यात आले होते. त्यांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एनआयव्ही पुणे यांनी दिला आहे. 73 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या प्रत्येकी 2 जण मुंबई व पुणे येथे भरती आहेत.

नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले असून राज्यात सध्या 39 विलगीकरण कक्षांमध्ये 361 बेड्स उपलब्ध आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post