माय अहमदनगर वेब टीम
श्रीनगर : श्रीनगरच्या लाल चौक परिसरात दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव दल (सीआरपीएफ) पथकाला लक्ष्य केले. दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात दोन स्थानिक नागरिक आणि एक सीआरपीएफचा जवान जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती बिघडवण्यासाठी दहशतवाद्यांकडून वारंवार गोळीबार केला जात आहे. काश्मीरच्या लाल चौक परिसरात दहशतवादी कारवाया करण्याच्या प्रयत्नात होते. परंतु, जवानांना पाहिल्यानंतर ते खवळले. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी जवानांच्या पथकावर ग्रेनेड हल्ला चढवला. या हल्ल्यात एक जवान तर दोन स्थानिक नागरिक जखमी झाले आहेत. या आधी २४ जानेवारी रोजी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर मधील जुन्या शहरात नूरबाग परिसरातील पोलीस चौकीवर ग्रेनेड हल्ला केला होता. या हल्ल्यात एक केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) चा जवान जखमी झाला होता. तर ८ जानेवारी रोजी श्रीनगरच्या हबाक चौकात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या एका पोस्टावर ग्रेनेड हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन स्थानिक नागरिक जखमी झाले होते.

Post a Comment