दिल्ली हिंसाचारात 22 मृत्यू आणि 250 जखमी, पंतप्रधान म्हणाले शांतता राखा


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली- उत्तर-पूर्व दिल्लीमध्ये सीएएविरोधात भडकलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे तर 250 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहे. जीटीबी रुग्णालयात 21 आणि जेपी रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला. घटनेच्या चौध्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शांतता राखण्याचे अपील केली आहे. तर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हिंसाचार होत असलेल्या परिसरांमध्ये लष्कर तैनात करण्याची मागणी केली. सरकारने आता परिस्थितीवर निमंत्रण मिळवण्यासाठी एनएसए अजीत डोभाल यांना जबाबदारी दिली आहे. बुधवारी दुपारी ते डीसीपी नॉर्थ-ईस्ट यांच्या कार्यालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. डोभाल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्रालयाला रिपोर्ट करतील.

दुसरीकडे, मंगळवार-बुधवारच्या रात्री 12.30 वाजता एका वकीलाच्या याचिकेवरुन दिल्ली कोर्टाने सुनावनी घेतली. मुस्तफाबाद हिंसाचारातील नागरिकांना येथील अल हिंद रुग्णलयातून एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याचे आदेश दिले. उत्तर-पूर्व दिल्लीतील चांदबाग परिसरात आज एका आयबी अधिकारी अंकित शर्माचा मृतदेह आढळून आला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post