4 डिसेंबरला रिलीज होईल 'ब्रह्मास्त्र'


माय अहमदनगर वेब टीम : अयान मुखर्जीच्या दिग्दर्शनात बनत असलेला सुपरहीरो चित्रपट 'ब्रह्मास्त्र' ची रिलीज डेट शेवटी फायनल झाली आहे. करण जोहरने एक फोटो शेअर करून रिलीजची तारीख अनाऊन्स केली. या फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांच्या घरी आलिया भट्‌ट, रणबीर कपूर आणि अयान मुखर्जी बसलेले दिसत आहेत आणि त्यांच्या हातात एक पाटीदेखील आहे, ज्यामध्ये 4 डिसेंबर 2020 लिहिले आहे.

आलियानेदेखील शेअर केला व्हिडिओ...
आलियानेदेखील आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये रणबीर, अमिताभ आणि अयान 'ब्रह्मास्त्र' च्या रिलीज डेटबद्दल चर्चा करताना दिसत आहेत. मात्र आलिया स्वतः तो व्हिडिओ बनवत होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post