... म्हणून सनी लिओनी कोणालाच देणार नाही सेल्फी


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी तिच्या सिनेमा जाहिरातींप्रमाणेच सोशल मीडियावरील पोस्टमुळेही सतत चर्चेत असते. सध्या सनी तिच्या एका खास फोटो आणि व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. या फोटो आणि व्हिडिओमधून तिने चाहत्यांना एका खास आजारापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

सध्या सनी लिओनी प्रोडक्शनमध्येही आपलं नशीब आजमावत आहे. नुकतंच तिला मुंबई विमानतळावर पती डॅनिअल वेबरसह पाहण्यात आले. यावेळी एका चाहतीने तिच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. पण सेल्फी घेताना सनीने चेहऱ्यावर मास्क लावलं आणि थोडीशी दूर गेली. सनीने जगभरात पसरत असलेल्या कोरोना वायरसमुळे केलं असल्याचं सांगितलं.
सनीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पती डॅनिअलसोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोत दोघांनी चेहऱ्यावर मास्क लावलेला दिसतो. हा फोटो शेअर करताना सनीने कॅप्शनमध्ये लिहिले की, तुमच्या आसपास काय चाललं आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुम्हाला वाटतं का की कोरोना वायरसचे शिकार तुम्ही होणार नाही. स्मार्ट व्हा आणि सुरक्षित रहा.
चीनच्या वुहान शहरात पसरलेल्या कोरोना वायरसचा प्रभाव आता हळूहळू जगभरात होताना दिसत आहे. प्रत्येक देश या वायरसपासून नागरिकांचं रक्षण करण्यासाठी विमानतळापासून रुग्णालयांपर्यंत आवश्यक गोष्टींची पूर्तता करताना दिसत आहे. कोरोना वायरसपासून वाचण्यासाठी भारत सरकारने महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत. केंद्रीय स्वास्थ्य मंत्रालयाने भारतात येणाऱ्या पर्यटकांच्या आरोग्य चाचणीसाठी २१ विमानतळावर थर्मल चाचणी सुरू झाली आहे. दरम्यान, भारत सरकारने नागरिकांना गरज नसेल तर चीनमध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post