खुशखबर ठाकरे सरकार 70 हजार रिक्त पदे भरणार


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - महाराष्ट्र सरकारने राज्यातील रिक्त असलेली 70 हजार पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी संध्याकाळी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यामध्येच हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, महाविकास आघाडी सरकार अ, ब, क आणि ड अशा सर्वच स्तरावर रोजगार देणार आहे. नुकतेच समोर आलेल्या सामान्य प्रशासन विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात 1 लाख 70 हजार पदे रिक्त आहेत. गेल्या 5 वर्षांपासून यावर भरती करण्यात आलेली नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्वच मंत्री उपस्थित होते. यामध्ये नोकर भरती आणि रोजगाराचा मुद्दा सर्वात महत्वाचा असल्याचे अधोरेखित करण्यात आले. नोकर भरतीमुळे सरकारी विभागांवर पडणारा कामाचा बोजा, केंद्रासह राज्यात सुरू असलेली आर्थिक लुडबुड या सर्वच समस्यांवर नोकर भरतीने तोडगा मदत होऊ शकते असेही सांगण्यात आले. सुत्रांच्या माहितीनुसार, अशोक चव्हाण आणि राजेश टोपे यांनी या मुद्यावर जोर लावून धरला. त्यानंतर सर्वानुमते रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, यासंदर्भात अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post