एनसीसीच्या पंतप्रधान वार्षिक रॅलीमध्ये नगरची यूगांशी गवळी


माय अहमदनहार वेब टीम
अहमदनगर - नवी दिल्ली येथे 28 जानेवारी रोजी करीअप्पा परेड ग्रांऊडवर झालेल्या एनसीसीच्या वार्षिक परेडमध्ये कॅडेट यूगांशी प्रविण गवळी हिने सहभाग नोंदविला. कॅडेट यूगांशी गवळी ही अहमदनगर शहरातील सिव्हील लाडको येथील रहिवासी असून, अहमदनगर महाविद्यालयात एसवाय बीए ची ती विद्यार्थीनी आहे. युगांशी गेल्या तीन महिन्यांपासुन यासाठी मेहनत करीत आहे.17 महाराष्ट्र बटालियनमध्ये तिची निवड झाली असून, एकूण 117 कॅडेटनी महाराष्टातून सहभाग नोंदविला होता. यामध्ये युगांशी गवळीसह मोनिका यादव व संकेत भोरे (कर्जत) या अहमदनगरच्या कॅडेटचीही निवड झाली होती.
28 जानेवारी रोजी पार पडलेल्या परेडमध्ये देशात पंजाबने पहिला तर अनूक्रमे महाराष्ट्र व तामिळनाडूने दूसरा व तिसरा क्रमांक पटकाविला. या परेडमध्ये भारतासह रशिया, मालदिव, श्रीलंका, सिंगापूर, भूतान व नेपाळ या देशांनीही सहभाग नोंदविला होता. तसेच देशातील इतर राज्येही यामध्ये सहभागी झाली होती. शुक्रवार दि.24 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या एनसीसीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात युगांशी गवळीची निवड झाली होती. वरील सर्व कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग तसेच तीनही सेनादलाचे प्रमूख उपस्थित होते. यानंतर पुढील आठवड्यात राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मुंबई येथे होणार्‍या परेड मध्येही ती सहभागी होणार आहे. तिच्या या यशाबद्दल अहमदनगर महाविद्यालयाचे प्राध्यापक, मित्रमंडळी, नातेवाईक तसेच सर्व नगरवासीयांकडून अभिनंदन होत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post