थंडीतपासून वाचण्यासाठी असे करा उपाय


माय अहमदनगर वेब टीम -
थंडीच्या दिवसांत श्वसनाचे विकार अधिक बळावतात. या त्रासांपासून दूर राहण्यासाठी खास टिप्स पाहुयात...
कडक उन्हाळ्यानंतर सगळेजण आता गुलाबी थंडीचा आनंद लुटतायत. सध्याच्या दिवसांत दिवस लहान झाला असून सगळीकडे वातावरण आहे ते नव्या वर्षाच्या जल्लोषाचं. मात्र अनेकांना थंडीचे दिवस अगदी नकोसे होतात. कारण थंडीचे दिवस आले की आजारांची जणू रांगचं लागते.
थंडीच्या दिवसांत श्वसनाचे विकार अधिक बळावतात. ज्या व्यक्तींना फुफ्फुसाचे आजार असतात त्यांना हे त्रास अधिक जाणवतात. थंडीच्या दिवसातील कोरडी हवा फुफ्फुसासंर्भातील आजारांना कारणीभूत ठरते.
हे आजार बळावू नये यासाठी खास टीप्स :
1) हिवाळ्याच्या दिवसात शरीर गरम राहिल असे कपडे घाला.
2) योग्य आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या.
3) डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं वेळेवर घ्या.
4) जर तुम्हाला श्वसनासंदर्भात किंवा अस्थमाचा त्रास असेल तर कुठेही जाताना सोबत तुमची औषधं बरोबर ठेवावी. आणि जर त्रास जाणवू लागला तर तातडीने औषधं घ्यावीत.
5) घरी असताना देखील शरीर गरम कसं राहिल हे पहा. एकाच जागी बसन राहू नका. शारीरिक हालचाल करा
6) वेळेवर जेवा. जेणेकरून शरीराला उर्जा मिळण्यास मदत होईल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post