स्वातंत्र्यानंतरही महात्मा गांधीच्या विचारांची गरज - प्रा.विधाते


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस व आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने वाडियापार्क क्रीडा संकुल येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, महिला जिल्हाध्यक्षा रेशमा आठरे, युवकचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष ढाकणे, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर, अमोल कांडेकर, रेखा जरे पाटील, सामाजिक न्यायच्या शहर जिल्हाध्यक्षा साधना बोरुडे, सुनंदा कांबळे, प्रा.बबन गाडेकर, फारुक रंगरेज, अक्षय घोरपडे, लहू कराळे, वसंतराव शिंदे, माऊली जाधव आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रा.माणिक विधाते म्हणाले की, जगातील अनेक महान व्यक्तींनी महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरणा घेतली. अहिंसेचे पूजारी व राष्ट्रपिता म्हणून संपुर्ण जगात त्यांची वेगळी ओळख आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी एका ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी मोठे जनआंदोलन उभे केले. स्वातंत्र्य मिळाले मात्र आजही सर्वसामान्य जनता हक्कासाठी संघर्ष करीत आहे. सत्याग्रहाच्या शस्त्राने त्यांनी ब्रिटीश राजवट उलथून लावली. सक्षम भारतासाठी महात्मा गांधीचे विचार आजही दिशादर्शक असून, या विचारांची आज गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post