सुसंस्कृत भारत घडवण्यासाठी युवा पिढीने तंत्रज्ञानाचे व संस्काराचे धडे गिरवणे गरजेचे - आ. संग्राम जगताप


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ साहेब यांच्या विचारांचा जागर करत आणि त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे. सुसंस्कृत भारत घडवण्यासाठी आजच्या युवा पिढीने तंत्रज्ञानाचे व संस्काराचे धडे गिरवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ साहेब यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी शहर काँग्रेसच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी आ. संग्राम जगताप बोलत होते. कार्यक्रमास नगरसेवक कुमार वाकळे, प्रकाश भागानगरे, माजी नगरसेवक विपुल शेटीया, बाबासाहेब गाडळकर, अॅड. प्रसन्ना जोशी, दिलदार सिंग बीर, वैभव ढाकणे, बबली गायकवाड, माउली जाधव, अमित गटने, अॅड. नेमाने, शशिकांत नजन, बंडू इवळे, अमित चिपाडे, अमित खामकर, साधना बोरुडे, रेखा जरे, दादा पांडुळे, रंजनाताई उकिरडे, दिनेश जोशी आदी उपस्थित होते.

आ. संग्राम जगताप पुढे म्हणाले की स्वामी विवेकानंदांचा आदर्श आजच्या युवा पिढी पुढे ठेवणे गरजेचे आहे. स्वामी विवेकानंदांनी दिलेले विचार आजच्या पिढीने अंमलात आणणे गरजेचे आहे. भारत देश महासत्तेकडे घेऊन जाण्यासाठी आजच्या युवा पिढीची मोठी जबाबदारी आहे. आजच्या युवकांनी ध्येय निश्चित करून आपल्या जीवनाची वाटचाल करावी. तसेच राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेल्या संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराज घडले तसे आजच्या महिलांनी आपल्या मुलांना जिजाऊंच्या संस्काराचे धडे द्यावे, राजमाता जिजाऊ या आपल्या समाजासमोर एक आदर्श माता म्हणून आहेत. आपल्या मुलांना योग्य संस्कार देऊन समाजाबद्दल आपुलकी निर्माण करावी, आपल्या मुलांना शिक्षणाबरोबर संस्कार, धार्मिकतेचे धडे दिले पाहिजेत. प्रत्येक विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या जीवनाची वाटचाल करावी. समाज समृद्ध घडण्यासाठी संस्काराची खरी गरज आहे. महापुरुषांच्या विचारांमुळे भारत देश लवकरच महासत्ता होईल यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी व युवकांनी महापुरुषांचे विचार अंगीकारावे असेही आ. जगताप म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post