शिर्डी बंदला राधाकृष्ण विखे पाटील यांचा पाठिंबा


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - शिर्डीतील बंदला भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. साईबाबा यांच्या जन्मस्थळाचा वाद व्हायलाच नको असे विखे पाटील म्हणाले आहेत. साई मंदिर शिर्डीत असले तरीही परभणी जिल्ह्यातील पाथरी हेच साईबाबांचे जन्मस्थान आहे असा दावा केला जात आहे. सरकारने या ठिकाणी विकासासाठी निधी सुद्धा मंजूर केला. याच मुद्द्यावरून शिर्डीच्या संतप्त स्थानिकांनी बेमुदत संप पुकारला. या संपकऱ्यांची विखे पाटील यांनी शनिवारी भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतरच आंदोनाला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

शिर्डीतील संपकऱ्यांची भेट घेतल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच साईबाबा जन्मस्थळाचा वाद व्हायलाच नको होता. तरीही मुख्यमंत्र्यांच्या वतीने पाथरीसाठी निधी मंजूर करण्यात आला. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिशाभूल करण्यात आली. तसेच त्यांना चुकीची माहिती देण्यात आली असा दावा यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post