बाल राज्य नाट्य स्पर्धेत अहमदनगरच्या नाट्य आराधनाचे ‘वानरायाण’ द्वितीय
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालय आयोजित 17 व्या बाल राज्य नाट्य स्पर्धेचा नाशिक केंद्राचा निकाल जाहीर झाला असून, नगरच्या नाट्य आराधनाने सादर केलेल्या ‘वानरायाण’ या नाटकास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. नाशिक केंद्रातून एकूण 44 बाल नाटकांमधून ‘वानरायाण’ या नाटकास द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. संस्थेचे अध्यक्ष व नाटकाचे दिग्दर्शक अनंत जोशी यांनाही दिग्दर्शनाचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. तसेच नाटकास प्रकाश योजनेचे प्रथम पारितोषिक तेजस अतितकर, नेपथ्यचे प्रथम लक्ष्मीकांत देशमुख आणि अभिनायाचे गुणवत्ता प्रमाणपत्र हर्षवर्धन महाडिक असे इतर महत्वाची पारितोषिके ‘वानरायाण’ला जाहीर झाली आहेत. मुंबई येथे होणार्या अंतिम फेरीसाठी ‘वानरायान’नाटकाची निवड झाली आहे.
‘वानरायाण’च्या या यशाबद्दल नाट्य आराधाना संस्थेच्यावतीने आंबेडकर स्मारक येथे कलेची आराध्य देवता नटराजांचे पूजन ज्येष्ठ नाट्य लेखक वामन पतके, ज्येष्ठ रंगकर्मी दिपक घारु यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे जिल्हा समन्वयक शशिकांत नजान, नाट्यकर्मी रघुनाथआंबेडकर, नाट्य आराधनाचे अध्यक्ष अनंत जोशी आदिंसह ‘वानरायाण’ मधील सर्व बाल वानरसेना, पालक, तसेच नाट्य आराधनाचे राजा देशमुख, संजय जोशी, संतोष दुशी, सागर शिंदे, दुर्वेश शेलार, महादेव गाडे, परेश पाटील आदि उपस्थित होते. नटराज पूजनानंतर ‘वानरायान’ ला द्वितीय पारितोषिक मिळाल्याबद्दल नाटकातील सर्व बाल कलाकारांसह उपस्थित सर्वांनी जल्लोष करत प्रभु रामचंद्र की जय..., जय हनुमान.... च्या घोषणा दिल्या तसेच एकमेकांचे अभिनंदन केले.
यावेळी बोलतांना वामन पतके म्हणाले, नगरच्या रंगभुमीचे काम उत्कृष्ट चालू आहे, अनेक कलाकार इथल्या मातीने रंगभुमीला दिले आहेत. बाल कलाकारांनाच योग्य व्यासपीठ मिळाले तर भविष्यात ते मोठे कलाकार होतील. अनंत जोशी यांच्या नाट्य आराधना संस्था अनेक वर्षांपासून बाल रंगभुमी क्षेत्रात चांगले काम करत आहे. राज्य नाट्य स्पर्धेत ‘वानरायाण’ या बाल नाट्याने द्वितीय क्रमांक मिळवून नगरच्या रंगभुमीत इतिहास रचला आहे. याबद्दल नाट्य आराधना संस्थेसह सर्व बाल कलाकार वानरसेनेचे हार्दिक अभिनंदन.
प्रास्तविकात अनंत जोशी म्हणाले म्हणाले, नगरच्या बाल कलाकारांना रंगभुमीवर प्रत्यक्ष नाटक सादर करण्यासाठी नाट्य आराधना हक्काचे व्यासपीठ आहे. बाल राज्य नाट्य स्पर्धेत गेल्या 10 वर्षांपासून पारितोषिक मिळविण्याचा अनेक संस्थांनी प्रयत्न केला त्यास वर्षी यश आले आहे. या वर्षीच्या राज्य नाट्य स्पर्धेत सादर झालेल्या 44 नाटकांमधून ‘वानरायाण’ बालनाट्यातील सर्व बाल कलाकारांनी उत्कृष्ट सादरीकरण केल्याने राज्यात द्वितीय आले हा नगरच्या रंगभुमीसाठी मोठा अभिमान आहे. नगरला प्रथमच बाल राज्य नाट्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाला आहे. सर्व ज्येष्ठ रंगकर्मींचे मार्गदर्शन, नाट्य आराधनाच्या सर्व पदाधिकार्यांनी घेतलेली मेहनत यामुळेच हे यश मिळाले आहे.
बाल राज्य नाट्य स्पर्धेत द्वितीय आलेल्या ‘वानरायाण’ या बाल नाट्याचा परिचय पुढीलप्रमाणे: लेखक व दिग्दर्शक अनंत जोशी, नेपथ्य - लक्ष्मीकांत देशमुख, प्रकाश योजना - प्रतिभा शेंडे, पार्श्वसंगीत - सुदर्शन कुलकर्णी व प्रद्युन्य गायकवाड, रंगभुषा व वेशभुषा - सागर शिंदे, रंगमंच व्यवस्था - कविता जोशी, गिरिजा जोशी, गणेश सावेकर, सुनिता तरटे, अभिजित जोशी, स्वप्नील नजान, सूत्रधार - संजय जोशी, संतोष दुशी, निर्मिती प्रमुख - स्वाती देशमुख, नाटकातील बाल कलाकार -स्वयं शिंदे, श्लोक गाडे, वेदांत शिंदे, चैतन्य जोशी, कार्तिक शिंदे, स्वराली जोशी, कस्तुरी जोशी, नैतिक रोकडे, ऋत्वीक रोकडे, आर्या झांबरे, दास्यभक्ती शेलार, आराध्या झांबरे, मल्हार शिंदे, रमा पाटील, पद्मनाभ जांभळे, स्वयं कुलकर्णी, स्वराज कुलकर्णी, भार्गव जोशी, नक्षत्रा तरटे, समृद्धी खिस्ती, हर्षवर्धन महाडिक, सिद्धी देशमुख आदि.
Post a Comment