गुलमोहर रोडवर अपार्टमेंटमध्ये चालणाऱ्या हायप्रोफाइल वेश्याव्यवसायावर छापा


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - गुलमोहर रोडवर अपार्टमेंटमध्ये चालणाऱ्या हायप्रोफाइल वेश्याव्यवसायावर छापा पोलिसांनी छापा टाकला आहे. या छाप्यामध्ये एका परप्रांतीय महिलेची सुटका केली असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

गुलमोहर रोड येथील अपार्टमेट मध्ये 8 वाजण्याच्या सुमारास प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके नगर शहर विभाग तसेच पोलिस निरीक्षक विकास वाघ, पोलीस हवालदार निपसे, पोलीस नाईक मिरपगार, पोलीस नाईक फसले, पोलीस कॉन्स्टेबल लहारे, खरात, महिला पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड, भगत, सुद्रीक यांचे टीमने गुलमोहर रोड वरील अपार्टमेंट मध्ये छापा टाकला. अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार 1 परप्रांतीय मुलीची सुटका करून कुंटणखाना चालवणारे अमर उर्फ़ विकी गोपालदास सोळुखे याचेवर स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3.4.5.7.8 प्रमाणे तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post