प्रजास्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा – जेटली, स्वराज, फर्नांडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर पर्रीकरांना मरणोत्तर पद्मभूषण
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – प्रजासत्ताक दिनाची पूर्वसंध्या अहमदनगरकरांना अभिमानास्पद ठरली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज शनिवारी पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये अहमनगरच्या आदर्शगाव हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार, बीजमाता राहीबाई पोपेरे, आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू जहीर खान यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे यंदा अहमदनगरला पद्म पुरस्कारांचा तिहेरी मुकूट मिळाला आहे. अभिनेत्री कंगना रनौत, गायक सुरेश वाडकर, अदनान सामी यांच्यासह अकरा जणांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.
भाजप नेते अरूण जेटली, सुषमा स्वराज आणि जॉर्ज फर्नांडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण सन्मान जाहीर झाला आहे. तर माजी केंद्रीय मंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचा मरणोत्तर पद्मभूषण सन्मान जाहीर झाला आहे. बॉक्सर मेरी कोम यांच्यासह एकूण ७ जणांना पद्मविभूषण सन्मान जाहीर झाले आहेत. उद्योगपती आनंद महिंद्रा, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांच्यासह १६ जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
पद्मविभूषण सन्मानाचे मानकरी :
दिवंगत जॉर्ज फर्नांडिस, दिवंगत अरुण जेटली, दिवंगत सुषमा स्वराज, दिवंगत विश्वेशतीर्थ स्वामी श्री पेजावर अधोखजा मठ उडुपी, अनिरुद्ध जुगनौथ जीसीएसके, छन्नुलाल मिश्रा, मेरी कोम
राज्यातील ५४ पोलिसांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार
पद्मभूषण सन्मानाचे मानकरी :
एम. मुमताज अली, सय्यद मुआझ्झीम अली (मरणोत्तर), मुझफ्फर हुसेन बेग, अजोय चक्रवर्ती, मनोज दास, बालकृष्ण दोषी, कृष्णम्मल जगन्नाथन, एस. सी. जमीर, अनिल प्रकाश जोशी, डॉ. सेरिंग लँडोल, आनंद महिंद्रा, नीलकांत मेनन (मरणोत्तर), मनोहर पर्रिकर (मरणोत्तर), जगदीश शेठ, पी. व्ही. सिंधू, वेणू श्रीनिवासन
पद्मश्री राहीबाई पोपेरे
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभळणे नावाच्या छोटाश्या आदिवासी खेड्यात राहणा-या. बिजमाता राहीबाई पोपेरे या आदिवासी दुर्गम भागात गावराण बियाण्यांची बॅंक चालवतात या माध्यमातुन त्यांनी हायब्रीड बियाण्यांचे वाण तसेच रासायनिक शेती यामुळे निर्माण होणा-या आरोग्याच्या व इतर समस्या वाढल्याने विषमुक्त शेती साठी त्यांनी भाजीपाल्यासह अन्य पिकांचे गावराण वाण व त्यांच्या बिया संकलित करण्याचा छंद जोपासला सुमारे विस वर्षांपासुन त्यांचे हे काम अविरत सुरु होते गावरान वाण शोधणे,लागवड करणे,पुन्हा त्यापासुन बिया काढुन संकलित करणे अशा पध्दतीने त्यांचे बिजबॅंकेचा विस्तार झाला
राहीबाई पोपेरे या हायब्रीड वाण आणि रासायनिक शेती यामुळे कुपोषणासहित आरोग्याच्या इतर समस्या वाढल्याने विषमुक्त शेतीसाठी कृतिशील प्रयत्न करीत आहेत. सुरवातीपासूनच शेतीची आवड असल्याने त्यांनी भाजीपाल्यासह अन्य काही पिकांचे गावरान वाण जपण्याचा, त्यांच्या बिया संकलित करून ठेवण्याचा वसा हाती घेतला. सुमारे वीस वर्षांपासून त्यांचे हे काम अथक सुरू आह आतापर्यंत त्यांनी ५४ पिकांच्या ११६ वाणांच्या गावरान बियांचे जतन केले आहे. त्यांना जाहीर झालेला हा पद्मश्री पुरस्कार त्यांच्या आजवर केलेल्या कामाची देणगीच आहे बायफ संस्थेच्या सहकार्याने त्यांचे या कामाची प्रसिध्दी देशपातळीवर पोहचली
पद्मश्री पोपटराव पवार
शिक्षणासाठी आपले गाव सोडून नगरमध्ये वास्तव्य करून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर गावातील ग्रामसभेत आपले विचार मांडले. तेव्हा हिवरे बाजार या गावातील सर्वांनी त्यांना एकमताने सरपंच म्हणून निवडले. तेव्हापासून आदर्श गाव निर्माण करण्यासाठी ते संपूर्ण आयुष्य झटले.
गावात व्यसनमुक्ती, गोबर गॅस प्रकल्प, श्रमदानातून रस्ते, चराईबंदी, गावातील प्रत्येक जण साक्षर व सुशिक्षित करून संपूर्ण हिवरे बाजारला आदर्श गाव बनवून जगाच्या नकाशावर मानाचे स्थान दिले. त्यांच्या या प्रयत्नांची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली. आज अनेक जण विदेशातून या गावात अभ्यास करण्यासाठी येतात.
पद्मश्री जहीर खान
श्रीरामपूर तालुक्यातून आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अविरत कष्ट घेऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झेप घेतली. क्रिकेटमध्ये आपली अमीट छाप सोडणा-या जहीर खानला पद्मश्री पुरस्कार मिळणे ही अत्यंत आनंददायी व क्रिकेटमध्ये करिअर करू पाहणा-यांसाठी प्रेरणादायी आहे. लहानपणा पासूनच क्रिकेटची आवड. त्याची ही आवड त्याचे करिअर व्हावे म्हणून त्याच्या वडिलांनी खूप मेहनत घेतली.
Post a Comment