स्पोर्ट डेस्क- न्यूजीलँडविरोधात सुरू असलेल्या पाच टी-20 सीरीजमधील दुसऱ्या सामन्यात भारताने 7 विकेट राखुन दणदणीत विजय मिळवला आहे. न्यूझीलँडने भारताला 133 धावांचे आव्हानदिले होते, भारताने फक्त 17.3 ओव्हर्समध्येहे लक्ष पूर्ण केले.
रविवारी ऑकलँडच्या ईडन पार्कमध्ये न्यूजीलँडने टॉस जिकुंन फलंदाजीचा निर्णय घेतला होता. 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 132 रनाचे लक्ष भारताला दिले होते. हे लक्ष पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताने 17.3 ओव्हरमध्येच हे लक्ष पूर्ण केले. भारताकडू राहुलने करियरचे 11वे अर्धशतक लगावले. श्रेयस अय्यरने 44 रनाची खेळी केली. ओपनींगला आलेल्या रोहित शर्माने 6 चेंडूत फक्त 8 रन काढले, तर कर्णधार विराट कोहली 11 रनावर आउट झाला.
Post a Comment