नगर पत्रकार समन्वय समितीतर्फे पत्रकार दिनी पत्रकारांचा गौरव
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर ः नगर पत्रकार समन्वय समितीच्या वतीने सोमवारी सायंकाळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी पुरस्कार मिळालेल्या पत्रकारांचा, ज्येष्ठ पत्रकारांचा आणि उपस्थित असणार्या सर्वच पत्रकार, प्रेस फोटोग्राफारांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमहापौर मालनताई ढोणे या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष गुंदेचा,साहेबराव कोकने, मिनाताई मुनोत, दिलीप वाघमारे, अदिनाथ जाधव, सुधीर मेहता,मन्सुरभाई शेख, जितेंद्र अग्रवाल आदी विचारपीठावर उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातपुते, अशोक सोनवणे, दिलीप वाघमारे, सुधिर पवार, प्रकाश भंडारी, मिलिंद बेंडाळे, विजयसिंह होलम, सुभाष चिंधे, दीपक मेढे, रोहित वाळके, मकरंद घोडके, विठ्ठल शिंदे, प्रकाश साळवे, सिध्दीश्वर मेटे,संदीप खोटे, राम नळकांडे, विक्रम बनकर, संदीप दिवटे, मुकुंद भट, राजेंद्र येंडे, शब्बीर शेख, अमिर सय्यद, अशोक तांबे, भारत पवार, मिलिंद देखणे,मिलिंद बेंडाळे, वाजित शेख,साजित शेख, राजेंद्र खरपुडे, अनिल शहा, मुरलीधर तांबडे, मयुर मेहता आदिसह दैनिक, साप्ताहिक, न्यूज पोर्टल व इलेक्ट्रॉनिक मिडियाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुधीर मेहता व शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन सय्यद वहाब यांनी केले, तर समितीचे बाबा जाधव यांनी प्रास्ताविक केले. आभार मन्सूरभाई शेख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांनीच प्रयत्न केले
Post a Comment