‘आधारकार्डशी लिंक न केल्यास पॅन कार्ड रद्द करत येणार नाही’
माय अहमदनगर वेब टीम
दिल्ली : केंद्र सरकारने आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. यासाठी अनेकदा मुदतवाढ दिल्यानंतर आता 31 मार्च 2020 पर्यंत आधार-पॅन लिंक करण्याची अंतिम मुदत सरकारने दिली आहे. पण, याबाबत गुजरात उच्च न्यायालयाने अजूनही पॅन-आधार लिंक न केलेल्यांसाठी दिलासादायक निर्णय दिला आहे. ‘आधारकार्डशी लिंक न केल्यास पॅन कार्ड रद्द करत येणार नाही’ असा निर्णय कोर्टाने दिला आहे.
एखाद्या व्यक्तीने आपले आधारकार्ड पॅनसोबत लिंक केले नसेल तरी त्याला आयकर परतावा भरण्यापासून किंवा व्यवहार करण्यापासून रोखू शकत नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालय जोपर्यंत आधार अॅक्टच्या वैधतेबाबत अंतिम निर्णय देत नाही तोपर्यंत सरकार कोणाचंही पॅन कार्ड अवैध ठरवू शकत नाही किंवा त्या व्यक्तीला डिफॉल्टर घोषीत करु शकत नाही. असंही कोर्टाने स्पष्ट केलं. एका याचिकेच्या सुनावणीवेळी हायकोर्टाने हा निर्णय दिला.

Post a Comment