माय अहमदनगर वेब टीम
जामखेड – शहरातील कान्होपात्रा नगर याठिकाणी एका पाच वर्षीय चिमुरडीवर शेजारी रहाणार्या विवाहित नराधमाने अत्याचार केेेला. ही घटना मंगळवारी (दि.21) घडली. घटनेमुुुुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी मुलीच्या आईने गुरूवारी (दि23) रात्री उशिरा जामखेड पोलिस स्टेशनला दिली. फिर्यादीवरून आरोपीला जामखेड पोलिसांनी घरातून अटक केली . त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी मंगळवारी दि २१ सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पीडित चिमुरडी ही शेजारी रहाणार्या आरोपीकडे घरी गेली आसता त्या ठिकाणी सदर आरोपीने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला व यानंतर सदरची घटना तू कोणाला सांगितली तर मारण्याची धमकी दिली. सदरची घटना घडूनही भीतीपोटी पीडित चिमुरडीने ही घटना कोणाला सांगितली नाही. मात्र ,अत्याचार झाल्यावर चिमुरडीस त्रास होऊ लागल्याने तिने गुरुवारी दि २३ ही घटना आपल्या आईस सांगितली.
त्यामुळे तात्काळ तिच्या आईने जामखेड पोलीस स्टेशनला धाव घेऊन फिर्याद दाखल केली. या वरुन सदर आरोपी विरोधात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला . त्यानुसार बाल लैंगिक आत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेचा गुन्हा दाखल होत आसताना आरोपीच्या संबंधित नातेवाईकांकडून पीडित मुलीच्या आईवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र , त्या दबावाला बळी न पडता पीडित मुलीच्या आईने फिर्याद दाखल केली.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अवतारसिंग चव्हाण हे करत आहेत. तसेच लवकरच आरोपीस श्रीगोंदा येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Post a Comment